| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

Home / Initiatives

राज्य महिला आयोगाचा २७ वा वर्धापन दिन संपन्न सकारात्मकता स्त्रीचा स्थायीभाव - डाँ.मनिषा कोठेकर


मुंबई दि. २४ जानेवारी २०२० - सकारात्मक विचार करणे, जगणे हाच स्त्रीचा स्थायीभाव असल्याचे इतिहास आणि वर्तमानातील संशोधन सांगते असे मत ‘भारतातील महिलांची सद्यस्थिती’चा अभ्यास करणारया सामाजिक कार्यकर्त्या डा़ँ मनिषा कोठेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वर्धापन दिनी व्यक्त केले.

आयोगाच्या सदस्या रोहिणी नायडु, ज्योती भोये, रिदा रशीद, सदस्य सचिव आस्था लुथरा, उपसचिव डाँ मंजूषा मोळवणे, निवृत्त सनदी अधिकारी उज्वल उके, सामाजिक कार्यकर्त्या डाँ मनिषा कोठेकर, विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनीधी, माविम आणि महिला आयोगाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा २७ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डाँ मनिषा कोठेकर यांनी भारतातील ‘महिलांची सद्यस्थिती - शिक्षण, रोजगार, आरोग्य’ या विषयावर नुकत्याच झालेल्या देशव्यापी संशोधनाबाबत मार्गदर्शन केले. देशभरातील महिलांची भौगोलिक, सामाजिक स्थिती वेगवेगळी असली तरी प्राप्त परिस्थितीतही सकारात्मक, आशावादी राहणे महिलांचा स्थायी भाव आहे. २९ राज्य आणि ५ केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ७५ हजार महिलांशी संवाद साधुन संशोधन अहवाल तयार करण्यात आला आहे. देशातील ९० % महिलांनी आधार कार्ड काढले आहे, ८० % महिलांनी स्वतचे बँक खाते उघडले आहे, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात महिलांचा मोठा वाटा आहे. शासनाच्या पाठपुराव्यामुळे शाळांमधे शौचालयाचे प्रमाण वाढते आहे. सोबतच देशात अजुनही होत असलेल्या लिंग भाव असमानतेबाबत तसेच बालविवाह, अनुसूचित जाती जमातीतील महिलांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. शिक्षणाचा टक्का वाढला असला तरी शिक्षणातील लिंग गुणोत्तर वाढलेले नाही. शिक्षणातुन महिलांची उभी केली जाणारी प्रतिमा ही आज ही त्यागाचीच असुन शौर्याचा उल्लेख टाळला जातो अशी भुमिका डाँ कोठेकर यांनी यावेळी मांडली.

निवृत्त सनदी अधिकारी उज्वल उके यांनी सकारात्मकता याविषयी मार्गदर्शन करताना, मुलांना पराभवासाठी ही तयार करावे असे आवाहन महिला वर्गाला करत यातुनच निकोप समाज तयार होईल असे मत व्यक्त केले. निर्मितीची ताकद असलेली महिला आत्महत्येसारखे विचार करत नाही अस सांगत आत्मसन्मानाने जगावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा यांनी आयोग स्त्रीयांच्या मुलभूत अधिकारांसोबतच बदलत्या काळातील प्रश्नांवर न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असुन राज्यातील कोणत्याही कानाकोपर्यातील महिला आयोगापर्यंत थेट पोहोचु शकते अशा पद्धतीने कार्यरत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आयोगाचे समुपदेशक लक्ष्मण मानकर यांनी केले


u-1
u-2
u-3

u-1
u-1
u-1