| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात आज जिल्हा नियोजन भवन येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन , विधी सल्लागार , समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित होते. ग्रामीण भागातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होतो आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते, त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग याद्वारे करत आहे. करण्यात येते, त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग याद्वारे करत आहे.


u-1
u-1
u-1

u-1
u-1