| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षीच्या महिला दिनाचे घोषवाक्य Break The Bias

संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षीच्या महिला दिनाचे घोषवाक्य break the bias हे ठेवले आहे,ज्याचा अर्थ होतो पूर्वाग्रह खंडित करा. पण मला वाटतं की आपण फक्त पूर्वाग्रह मोडीत काढण्यापुरत मर्यादित न राहता, स्वतःच वेगळं विश्व कस निर्माण करता येईल यावरही भर दिला पाहिजे.

आज राज्यभरात break the bias या नाऱ्याखाली हजारो तरुणी घराबाहेर पडून आपला आवाज उंचावतायत. मला मान्य आहे की एका स्त्रीला घराबाहेर पडून स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी एका पुरुषापेक्षा किती तरी अधिक झगडावं लागत. इतकंच काय तर अनेक ठिकाणी एका स्त्रीला जन्म घेण्यासाठीची तिची लढाई ही आईच्या पोटातूनच सुरू करावी लागते.

घरचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल या विचारात आयुष्य न घालवता आधी जे करायचंय ते करा, जिथे संकट येईल तिथे त्या संकटाचा सामना करायला मी तुमच्या सोबत आहे.

एकदा एका पत्रकार महिलेने जेष्ठ कार्टुनिस्ट आर के लक्ष्मण यांना विचारलं की तुमची कार्टून्स नेहमी 'कॉमन मॅन' चीच का असतात ती कॉमन वुमन वर का नसतात त्यावर त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं ते म्हणजे 'एक स्त्री कधीच कॉमन असू शकत नाही ती नेहमी स्पेशल असते'.

जाता-जाता एवढंच सांगेन की, 'कभी उदास न होना, क्योकि मैं तुम्हारे साथ हु। सामने न सही पर आस-पास हु। जब भी आए कोई मुसीबत बस मुझे आवाज देना, मैं हरपल तुम्हारे साथ हु, मैं हरपल तुम्हारे साथ हु।

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


u-1
u-1
u-1

u-1
u-1
u-1

u-1
u-1
u-1

u-1
u-1
u-1