| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

घरातील महिलेच्या भक्कम पाठिंब्यामुळेच जवान देशासाठी लढत असतात - विजया रहाटकर.


वीरमाता आणि वीरपत्नींचा जीवनप्रवास ऐकुन उपस्थित झाले भावूक* मुंबई, दि. ८ मार्च – वीरपत्नी, वीरमाता सीमेवर लढायला गेल्या नसतील; पण त्यांचे धैर्य, साहस, वीरता तसूभरही कमी नाही. किंबहुना त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच जवान देशासाठी बलिदान देण्यास मागेपुढे पाहत नाहीत, अशी भावना व्यक्त करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्यातील चार वीरमाता आणि वीरपत्नी यांचा गौरव केला. यावेळी भारतीय लष्करासाठी मार्शल धून संगीतबद्ध करणाऱ्या नागपुरच्या गायिका संगीतकार डाँ तनुजा नाफडे यांनी आपला प्रवास उलगडुन सांगितला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयात अभिनेत्री ईशा कोप्पीकर यांच्या उपस्थितीत, आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी श्रीमती कनिका, शहीद मेजर अतुल गर्जे यांच्या वीरपत्नी श्रीमती हर्षला, शहीद साताप्पा महादेव पाटील यांच्या वीरपत्नी श्रीमती अश्विनी, शहीद मेजर विनायक गोरे यांच्या वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लष्करासाठी मार्शल धून बनविणारया डाँ तनुजा नाफडे या विशेष निमंत्रित होत्या. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव डाँ मंजूषा मोळवणे, माविमच्या संचालक कुसुम बाळसराफ, श्रीमती कुंटे, अभिनेत्री मीना नाईक, विविध समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

देशातील वीरमाता आणि वीरपत्नींप्रती असलेला आदर राज्य महिला आयोगाने त्यांचा गौरव करुन व्यक्त केला. राज्याच्या विविध भागातुन आलेल्या सन्मानित वीरपत्नी आणि वीरमाता त्यांचा, कुटुंबियांचा जीवनप्रवास, संघर्ष सांगत असताना उपस्थित भावुक झाले.

देशाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र, प्रतिकूल परिस्थितीतही सीमेवर पहारा देणाऱ्या लष्करासाठी मार्शल धुन संगीतबद्ध करण्याची संधी नागपुरच्या गायिका-संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांना मिळाली. इंग्रजांच्या काळापासून पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असलेलली मार्शल धून भारतीय लष्करासाठी वाजविली जात होती, या मार्शल धून च्या संगीतात भारतीयत्वाची उणीव होती. डॉ. नाफडे यांनी ही उणीव भरून काढली. निवडीच्या कठोर प्रक्रियेतून ही धून भारतीय लष्करासाठी निवडण्यात झाली आहे. स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताकदिनी लष्करी संचलनाच्या वेळी ही मार्शल धून आता संपूर्ण देशात ऐकायला मिळणार आहे. या कामासाठी डॉ. तनुजा नाफडे यांना अलीकडेच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिल्लीतील सोहळ्यात ताम्रपत्र देऊन गौरविले. डाँ नाफडे यांच्यामुळे महाराष्ट्राला हा बहुमान मिळाला आहे. आपल्या भाषणात डाँ नाफडे धून संगीतबद्ध करण्याच्या आगळ्यावेगळ्या कामाचा प्रवास आणि यातुन जात असतानाची भावना विषद केली. .

वीरपत्नी, वीरमाता यांचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कटिबद्ध असुन आयोगच्या अध्यक्षा म्हणुन आपण दुवा म्हणुन काम करु असा विश्वास यावेळी विजया रहाटकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयोगाचे वरिष्ठ समुपदेशक श्री लक्ष्मण मानकर यांनी तर नियोजन समुपदेशक श्रीमती सकीना शरीफ व आयोगाच्या सर्व कर्मचार्यांनी केले.


u-1
u-2
u-3

u-4
u-5